नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परिसरात फोनवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार त्रिकुटाने हिसकावून नेला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे. याप्रकरणी विशाल किसन धनराळे (२९ रा.साईनगर,नांदूरनाका) या युवकाने तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस टाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अॅथनी संजय मिरपगार (२२ रा.चांदशहावाली बाबा दर्गा मागे,साईनाथनगर नांदूरनाका) व सोनू उर्फ निवृत्ती राजू जाधव (२६ रा.मुर्ती कारखाना समोर निसर्ग नगर,नांदूरनाका) अशी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नावे असून त्यांचा एक साथीदार अद्याप पसार आहे. धनराळे रविवारी (दि.९) दुपारच्या सुमारास साईनगर येथील नांदूरनाका शाळा भागातून फोन वर बोलत रस्त्याने जात असतांना ही घटना घडली होती. पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार संशयित भामट्यांनी त्याच्या हातातील सुमारे १८ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला होता. याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी चक्र फिरवीत दोघाना ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलिस नाईक कहांडळ करीत आहेत.
नाशिक शहरातून दोन दुचाकी चोरीला
शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरीला गेल्या. याप्रकरणी पंचवटी आणि गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना गंगापूर गावात घडली. धिरज मधुकर इल्हे (रा.तिरूमल्ला ग्लोरी अपा.शिवसृष्टी नगर गंगापूरगाव) यांची एमएच १५ इक्यू ७६९६ सोमवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.
दुस-या घटनेत नंदूरबार येथील फिलीप रेग्या वसावे (२७ रा. आमलान ता.नवापूर ) हा तरूण सोमेवारी (दि.१०) शहरात आला होता. अमृधाम येथील सदानंद सोसायटीच्या पार्किंगमध्ये त्याने आपली पल्सर जीजे २६ एस ३७३८ पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत.