नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्यांच्या कॅटवर अंदर बाहर जुगार खेळणा-या चार जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मोरेमळा परिसरातील आंब्याच्या झाडाखाली उघड्यावर हे चारही जण जुगार खेळत होते. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ता सिताराम वाघमारे (रा.पवारवाडी,ना.रोड),रामा हरी गोतरणे (रा.मोरेमळा ना.रोड),रोहिदास ज्ञानोबा चव्हाण (रा.जेलरोड) व विश्वनाथ दगू खडांगळे (रा.मोरेमळा) अशी अटक केलेल्या जुगारींची नावे आहेत. मोरे मळयातील महालक्ष्मी मंदिर परिसरातील पिंपळपट्टी रोडवर एका झाडाखाली उघड्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता संशयित पत्यांच्या कॅटवर अंदर बाहर जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस कर्मचारी अजय देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक गावले करीत आहेत.
कॉलेजरोडवर पादचाऱ्याचा मोबाईल लांबवला
कॉलेजरोड भागात रस्त्याने पायी जाणा-या व्यक्तीच्या खिशातील मोबाईल त्रिकुटाने हातोहात लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नकुल विनोदराव देशपांडे (रा.गुरूगोविंद कॉलेज मागे,इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. देशपांडे शुक्रवारी (दि.२३) सायंकाळी कॉलेजरोड भागात गेले होते. थत्तेनगर येथील क्रोमा शोरूम जवळील कोटक महिंद्रा बॅके समोरून ते पायी जात असतांना ही घटना घडली. पाठीमागून आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने त्यांना बोलण्यात गुंतवून पॅण्टच्या पाठीमागील खिशात ठेवलेला सॅमसंग कंपनीचा महागडा मोबाईल हातोहात लांबविला. अधिक तपास पोलिस नाईक गवे करीत आहेत.