नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७८ हजार रूपयांचा एेवज चोरट्यांनी केला लंपास. हनुमानवाडी भागात झालेल्या या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी शालिनी शरद आढाव (रा.मैत्रीबंध सोसा.हनुमानवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आढाव कुटुंबिय गेल्या शनिवारी (दि.१०) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७८ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास
देवळाली गाव येथील सोमवारच्या आठवडे बाजारात भाजीबाजारातील गर्दीत वृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी उषा जगन्नाथ सनानसे (७० रा. मोटवाणीरोड, नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनानसे या सोमवारी (दि.१२) देवळाली गावातील आठवडे बाजारात खरेदीसाठी गेल्या असता ही घटना घडली. सुराणा हॉस्पिटल परिसरातील ग्राऊंड भागात त्या भाजीपाला खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ४८ हजार रूपये किमतीची सोनसाखळी हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.