नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील दत्तचौक भागात गार्डनमध्ये बोलावून घेत एकाने शिवीगाळ व मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत रामदास मरकड (रा. रामकृष्णनगर, शांतीनगर) असे महिलेचा विनयभंग करणा-या संशयिताचे नाव आहे. संशयिताने रविवारी (दि.४) ओळखीचा फायदा उचलत पीडितेस दत्तचौक भागातील सुयोजित गार्डन मध्ये बोलावले होते. महिला गार्डनमध्ये गेली असता ही घटना घडली. संशयिताने तिला शिवीगाळ व मारहाण करीत तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.
शेतातील झाडे चोरट्यांनी कापून नेली
आडगाव शिवारातील मेडिकल कॉलेज जवळ शेतातील झाडे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना घडली. या घटनेत चार सागाचे व एक लिंबाचे झाड चोरट्यांनी चोरून नेली असून, याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूण रामू शिंदे (५२ रा.जानोरीरोड,आडगाव शिवार) यांनी तक्रार दाखल केली आहे.
शिंदे यांचे आडगाव मेडिकल कॉलेज जवळ शेत जमिन असून, गेल्या २३ मे रोजी ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी शेतात कोणी नसल्याची संधी साधात बांधावरील सागाची चार आणि लिंबाचे एक झाड असे सुमारे २७ हजार रूपये किमतीचे पाच झाडी चोरट्यांनी कापून नेले. अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.