नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी मुंबईनाका आणि उपनगर पोलिस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना शिखरेवाडी भागात घडली. दर्शन अशोक कांबळे (रा.न्यु शिखर अपा.शिखरेवाडी मैदानासमोर ना.रोड) यांची दुचाकी एमएच ०५ डीटी ५३९६ मंगळवारी (दि.३०) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बोडके करीत आहेत.
दुस-या घटनेत भाभानगर येथील फिरोज अब्दूल रेहमान शेख (रा.सिमरन अपा.मोती ज्वेलर्स जवळ) यांची पॅशन प्रो दुचाकी (एमएच १५ ईसी ८९९२ )बुधवारी (दि.३१) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक भोये करीत आहेत.
हातातील मोबाईल हिसकावला
दसक येथे फोनवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या ५० वर्षीय व्यक्तीच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम नारायण काळे (रा.नारायण बापूनगर जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
काळे हे गुरूवारी (दि.१) दसक भागात गेले होते. अभिनव मराठी शाळेच्या प्रवेशद्वारासमोरून ते फोनवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या हातातील सुमारे पाच हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.