नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावरकरनगर येथे पार्क केलेल्या कंटेनर मधून चोरट्यांनी दोन लाखाचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. चोरट्यांनी कंटेनरमधून लोखंडी पाईप, बॅटरी, रॅम उतरविण्यासाठी लागणारे सपोटर, टूल बॉक्स व चायनीज फिंगर चोरुन नेले.
याप्रकरणी अंकित पारसमल पिचा (रा. तेजोवली अपार्टमेंट, रिवोडाईंग हॉटेल जवळ, सावरकरनगर) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिचा यांचा कंटेनेर जीजे ०९ बीवाय ७१३८ गुरूवारी (दि.१) त्यांच्या राहत्या सोसायटी शेजारील मोकळया जागी पार्क केलेला असतांना ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी कंटेनर मधील लोखंडी पाईप, बॅटरी, रॅम उतरविण्यासाठी लागणारे सपोटर, टूल बॉक्स व चायनीज फिंगर असा सुमारे १ लाख ९५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.