रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Nashik Crime १) कोयता घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई २) पेठरोडला युवकाची आत्महत्या

by India Darpan
ऑगस्ट 12, 2023 | 3:16 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा येथील गेटवे हॉटेलच्या भिंती लगत असलेल्या महाकाली चायनीज सेंटर जवळ कोयता हातात घेवून दहशत माजविणा-या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत संशयितांच्या ताब्यातून कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुदेश बाळासाहेब मोरे (३६ रा. बजरंग चौक विजयनगर,सिडको) व अभिषेक ज्ञानेश्वर शिरसाठ (२९ रा.काळे मळा चाळ,मोरेमळा सिडको) अशी कारवाई करण्यात आलेल्या कोयताधारींची नावे आहेत. गुरूवारी रात्री हे दोघे कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजवित होते. याबाबतची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून कोयता हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत नंदकुमार जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

१९ वर्षीय युवकाची राहत्या घरात आत्महत्या
१९ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना पेठरोडवरील तेलंगवाडी भागात घडली. सागर दिनकर महाले (रा.लक्ष्मणनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. सागरच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महाले याने शुक्रवारी (दि.११) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लाकडी अडगईला कमरेचा पट्टा बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत दिनकर महाले यांनी खबर दिल्याने पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime १) बंगल्याच्या घरपट्टी आणि पाणीपट्टीवरुन वाद २) दोन रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी

Next Post

अभिनेत्री अनिता दाते पुन्हा रंगभूमीकडे… या नव्या नाटकाचा शुभारंभ…

Next Post
IMG 20230812 WA0157 1 e1691823910650

अभिनेत्री अनिता दाते पुन्हा रंगभूमीकडे... या नव्या नाटकाचा शुभारंभ...

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011