नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केल्या आहे. या दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर आणि अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना अंबड औद्योगीक वसाहतीतील संजीवनगर भागात घडली. चेतन माधव सोळसे (१९ रा.गॅलेक्सी अपा.संजीवनगर अंबड) या युवकाने सोमवारी (दि.८) वॉचमन रूममधील पंख्याच्या कडीला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत भाऊ सोनू माधव सोळसे यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिक नगर भागात घडली. येथे राहणा-या हेमंत गोरख माळी (३२ रा.उज्वल सोसा.मनोहर चौक) यांनी रविवारी (दि.७) रात्री आपल्या घरासमोरील आंब्याच्या झाडाला अज्ञात कारणातून दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाचा ज्ञानेश्वर जाधव यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ.राहूल पाटील यांनी उपचारापूर्वी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.