नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील शिवाजी चौकात १ लाख १७ हजार रूपयांचा पान मसाला व सुगंधी सुपारी असा मुद्देमाल अमली पदार्थ विरोधी पथकाने हस्तगत केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल बापू पाटे (वय ३८, रा. महाले फार्म, सिडको) आणि निलेश आनंदा वाणी (३७, रा. दत्त चौक, सिडको) अशी संशयितांची नावे आहेत. पो
सकाळी सात वाजेच्या सुमारास गुटखा खोलीतून दुस-या वाहनात टाकत असतांना पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत ही कारवाई केली. संशयित पाटे हा त्याचे मोपेड दुचाकीच्या (एमएच १५ जीटी ०४४५) डिक्कीत ९ हजारांचा गुटखा भरून विक्रीसाठी घेवून जात असतांना तो पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत त्याने वाणी याच्याकडून गुटखा पुरविला जात असल्याची माहिती दिल्याने पथकाने वाणी यांचे घर गाठून झडती घेतली.
या कारवाईत १ लाख आठ हजारांचा गुटखा साठा पोलिसांच्या हाती लागला असून दोघा संशयितांविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक वरुन पुढील तापसाकरीता अंबड पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थ विक्री व साठा करणा-यांवर धडक ही कारवाई सुरू आहे.
अंमलदार देवकीसन गायकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांनी सापळा रचण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार गणेश भामरे, संजय ताजणे, नितीन भालेराव, विनायक आव्हाड, चंद्राकांत बगाडे, योगेश सानप, रवींद्र दिघे, अनिरुद्ध येवले, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे आणि महिला अंमलदार अर्चना भड आदींनी शिवाजी चौकातील भाजी बाजार भागात मंगळवारी तळ ठोकत ही कारवाई केली.