नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकलहरे येथे गुटख्याची निर्मीती करणा-या काऱखान्यावर पोलिसांनी छापा टकात तीन जणांना गजाआड केले आहे. या धाडीत सुमारे सव्वा दोन लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश बाबूलाल कुमार (३५ मुळ रा.उत्तरप्रदेश हल्ली अरिंगळे मळा सिन्नरफाटा), नीलेश दिनेश इंगळे (३३ रा. पाटीलनगर त्रिमूर्ती चौक सिडको) व दीपक मधुकर चव्हाण (रा. बुरकुले हॉलमागे,उत्तमनगर सिडको) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रालगत सामनगाव शिवारात बनावट गुटखा तयार केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.३) दुपारच्या सुमारास नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली मातृछाया फार्म हाऊस येथे छापा टाकण्यात आला असता हा प्रकार समोर आला.
सहायक निरीक्षक गणेश शेळके, हवालदार पुंडलिक टेपने, संतोष पिंगळ, पोपट पवार, अविनाश हांडे, बाळकृष्ण सोनवणे, ताजकुमार लोणारी आदींच्या पथकाने छापा टाकला असता संशयित बनावट गुटख्याची निर्मीती करतांना मिळून आले. याठिकाणी गुटखा बनविण्याचे मशीन तसेच केमिकल, विविध कंपन्यांच्या नावाचे लेबल, गुटखा बनविण्यासाठी लागणारा बनावट कच्चा माल जप्त असा सुमारे २ लाख १३ हजार ९२० रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून तो पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अंमलदार पिंगळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.
परिचीतानेच लावली कारची विल्हेवाट
पाच-सहा दिवस वापरण्यासाठी आणलेल्या कारची परिचीताने परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहिल पठाण (३० रा.बडीदर्गा) असे कारमालकाचा विश्वासघात करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सुशांत अशोक पवार (२२ रा.देवगाव रंगारी ता.कन्नड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे.
संशयित आणि तक्रारदार एकमेकांचे परिचीत असून यातून ही घटना घडली. पवार याच्या वडिलांच्या नावे असलेली एमएच २० बीवाय ४९९४ ही संशयिताने गेल्या १७ जून रोजी पाच सहा दिवसांसाठी वापरण्यासाठी नेली होती. ती अद्याप परत केली नाही. दोन महिने उलटूनही कार परत न केल्याने पवार याने कारबाबत संशयिताकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. कारचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने पवार यांनी पोलिसात धाव घेतली असून कारची विल्हेवाट लावल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Police Raid Car Theft