नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राधिका लॉटरी सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकत तब्बल २९ जणांना ताब्यात घेऊन ४६ हजार रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. भद्रकाली परिसरातील ठाकरे गल्ली येथील लॉटरी सेंटरमध्ये हा छापा टाकण्यात आला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितामध्ये नाशिकसह अहमदनगर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरातील जुगारींचा समावेश आहे.
संतोष शेट्टी (रा.नाशिक),मंगेश बच्छाव (रा.उत्तमनगर,सिडको),रमेश घोडके (रा.दत्तमंदिर सिडको),गणेश धोरण (रा.सावरकरनगर,सातपूर),अनिल देसले (रा.बागवाणपूरा,भद्रकाली),दिगंबर कोरडे (रा.घोटी ता.इगतपुरी),मोबीन शेख (रा.बडीदर्गाजवळ,भद्रकाली),राहूल वाघ (रा.मातंगवाडा,भद्रकाली),चंद्रमणी किर्तण (रा.पवननगर,सिडको),सुरेश अहिरे (रा.पवननगर,सिडको),गोपाळसिंग टाक (रा.श्रीरामपूर अ.नगर),सुरेश देवकर (रा.नाथगल्ली पंचवटी),पृथ्वीराज बनसोडे (रा.शिवणी ता.जि.गोंदीया),पंढरी गवई (रा.डोंगर कणी जि.वाशिम),अशोक मिसाळ (रा.तिडके कॉलनी,नाशिक),गोपीसिंग जुन्नी (रा.श्रीरामपूर जि.अ.नगर),अशोक मानकर (रा.तिडके कॉलनी,नाशिक),अतुल गांधी (रा.जुनी तांबटलेन),गुरूनाथसिंग टाक (रा.श्रीरामपूर जि.अ.नगर),जगजीतसिंग जुन्नी (रा.श्रीरामपूर जि.अ.नगर),सुरजसिंग सुन्नी (रा.श्रीरामपूर जि.अ.नगर),मंजूसिंग टाक,पवनसिंग जुन्नी,चंदुसिंग जुन्नी (रा. सर्व श्रीरामपूर जि.अ.नगर),भगवानसिंग परदेशी (रा.नेहरूचौक,सोमवारपेठ),विनोद जगताप (रा.मोदकेश्वर वसाहत तिवंधा),देवराम हुलगुंडे (रा.कोणेगाव ता.त्र्यंबकेश्वर),गोलिसिंग टाक (रा.श्रीरामपूर जि.अ.नगर) व गजानन अंधारे (रा.गणेशवाडी,पंचवटी) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सशयित जुगारींची नावे आहेत.
राधीका लॉटरी सेंटर मध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी (दि.८) भद्रकाली पोलिसांनी छापा टाकला असता संशयित पैसे लावून कल्याण तसेच मेनस्टार लाईन मटका नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ४५ हजार ९६४ रूपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस नाईक सचिन अहिरराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक ठाकूर करीत आहेत.