नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळ्या भागात जुगार खेळणा-या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जुगारीवर कारवाई केली. या कारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी भद्रकाली, म्हसरूळ आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई मिशनमळा भागात करण्यात आली. याबाबत पोलिस शिपाई सागर चौधरी यांनी फिर्याद दाखल केली आहे. तिबेटीयन मार्केट भागात काही युवक जुगार खेळत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता जोसेफ सुरेश जाधव (रा.लक्ष्मणनगर पेठरोड) व अॅलेक्स आनंदराव राजोळे (रा. मिशनमळा,शरणपूररोड) हे दोघे डब्ल्यूएनएस जवळ उघड्यावर कल्याण, श्रीदेवी आणि डे मिलन नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस शिपाई सागर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक लोंढे करीत आहेत.
दुस-या कारवाईत पोलिसांना भद्रकालीतील मौलाबाबा जीमच्या बाजूला काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दुपारच्या सुमारास छापा टाकला असता मोईन उर्फ मोईनुद्दीन अब्दूलरज्जाक शेख (रा.दखनीपुरा,उम्राव मेडिकलच्या बाजूला फुले मार्केट), नवाज शेरू पठाण (रा.सहकारनगर,भिमवाडी) व रोहित ज्ञानेश्वर सोळसे (रा.सहकारनगर भिमवाडी) आदी जीमच्या बाजूला असलेल्या मोकळया मैदानावर उघड्यावर स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांना अटक करीत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत केले असून याप्रकरणी पोलिस शिपाई निलेश विखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक सय्यद करीत आहेत.
तिसरी कारवाई पेठरोडवरील मेघराज बेकरी भागात करण्यात आली. बेकरी परिसरातील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगार खेळला जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता लक्ष्मण सुधाकर लिलके (रा.रामनाथनगर,तवलीफाटा),रोहित चांगदेव गुंजाळ, विजय कु-हाडे व दिपक कु-हाडे (रा.तिघे तेलंगवाडी,पेठरोड) आदी अंक अकड्यांवर मिलन व टाईम बाजार नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस शिपाई पंकज चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक फुलपगारे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten