नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने तडिपार गावगुंडासह त्याच्या चोरट्या साथीदाराच्या ताब्यातून चोरीच्या मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेले वाहन असा सुमारे ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोघा चोरांना म्हसरूळ पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. यातील एक संशयित हा तडिपार आहे. चोरीचे मोबाईल विक्रीसाठी दोघे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने शालिमार भागात सापळा लावला. आणि या चोरांना ताब्यात घेतले.
पांडूरंग उर्फ पांड्या हनुमंत शिंगाडे (१९ रा.दुर्गामाता मंदिराशेजारी,पंचशिलनगर गंजमाळ) व गणेश शाम जाधव (२१ रा. म्हसोबावाडी, गंजमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यातील शिंगाडे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शालिमार येथील संदर्भ सेवा रूग्णालय परिसरात चोरीचे मोबाईल विक्रीसाठी चोरटे येणार असल्याची माहिती युनिट १ चे कर्मचारी विशाल काठे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे युनिट १ च्या पथकाने सापळा लावला होता. संदर्भ सेवा रूग्णालयात दाखल होताच दबा धरून बसलेल्या त्यांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांच्या ताब्यातून चोरीचे मोबाईल आणि गुह्यात वापरलेले वाहन असा सुमारे ९० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यांना चोरीच्या गुह्यात म्हसरूळ पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
शिंगाडे याच्याविरोधात शहर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केलेली असतांना त्याचा वावर शहरातच होता. भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतील मारहाणीच्या गुह्यात तो फरार होता. त्याच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर,जमादार रविंद्र बागुल,हवालदार नाजिम पठाण,पोलिस नाईक विशाल देवरे. विशाल काठे,प्रशांत मरकड,अंमलदार राजेश राठोड,जगेश्वर बोरसे मुक्तार शेख आदींच्या पथकाने केली.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Mobile theft Arrested Crime Branch