नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिसांनी दोन मोबाईल चोरट्याला गजाआड करुन त्यांच्याकडू ९० हजार रुपयाचे आठ मोबाईल हस्तगत केले. नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केली. गेल्या काही दिवसापासून मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून त्याचा पोलिस शोध घेत असतांना गुप्त माहितीच्या आधारी ही कारवाई केली.
हे मोबाईल चोर नाशिकरोड बस स्थानक येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. संशयित रोन्या उर्फ रोहन सुभाष जाधव (२५) राहणार हरी संस्कृती, गाडेकर मळा व पारू उर्फ परवेज जतीफ पटेल (२४) रा. जेऊद्दीन डेपो, मालधक्का रोड या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून ९० हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे आठ मोबाईल हस्तगत केले.रमाकांत विनोदकुमार पासवान (१९) या युवकाचा मोबाईल चोरी झाल्याचा गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्हयातील चोरट्यांचा शोध घेत असतांना गुन्हे शोध पथकाला मोबाईल चोरटे हाती लागले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत,सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, अखलाक शेख, सुभाष घेगडमल, संदीप पवार, मनोहर कोळी, नाना पानसरे, कल्पेश जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, यशराज पोतन यांनी केली.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten