नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात शुक्रवारी वेगवेगळया भागात पोलिसांनी छापे टाकून दोन बेकायदा दारु विक्रेत्यांवर कारवाई केली. या कारवाईत संशयितांच्या ताब्यातून मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी देवळाली कॅम्प व सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला प्रकार औद्योगीक वसाहतीत समोर आला. पोपट शंकर खाडे (रा.महालक्ष्मी चौक,प्रबुध्दनगर) हा शुक्रवारी सायंकाळी औद्योगीक वसाहतीत सातपूर ते प्रबुध्द नगर मार्गावर असलेल्या बॉश कंपनीच्या समोरून बेकायदा दारू वाहतूक करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून ९५० रूपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी अंमलदार मोहन भोये यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.
दुसरा प्रकार भगूर येथील विनोद गोकुळ चाटोळे (४९ रा. समतावाडी) हा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भगुर बसस्थानक परिसरातील मोकळय़ा जागेत दारू विक्री करतांना मिळून आला. संशयितांच्या ताब्यातून सुमारे १ हजार ५४० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी शिपाई राहूल बलकवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.