नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकरा जणांविरूध्द सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुहेरी खूनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने भुषण लोंढे समर्थकांनी विनापरवानगी जमाव जमविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुषण लोंढे,प्रिन्स सिंग,वतन पवार, निखील निकुंभ, सनी उर्फ ललीत विठ्ठलकर, किशोर गायकवाड, संदिप गांगुर्डे, आकाश मोहिते, प्रकाश लोरा, विकी लोरा व समाधान जगताप (रा. सर्व स्वारबाबानगर,सातपूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी अंमलदार भगवान शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित भुषण लोंढे आणि अन्य साथीदारांची बुधवारी सराईत गुन्हेगार निखिल गवळे व अर्जून आव्हाड यांच्या दुहेरी हत्याप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. गुरूवारी (दि.२७) सकाळी संशयित सातपूर येथे पोहचताच मोठा जमाव जमला होता. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.