नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फुलेनगर भागात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणातून तरूणास एकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत संशयिताने काही तरी वस्तू मारूण फेकल्याने तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश सुनिल गायकवाड उर्फ बुट्या (रा.म्हाडा बिल्डींग, सम्राटनगर) असे तरूणास मारहाण करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सनी अनिल ढवळे (२२ रा. बुध्दविहारसमोर, सम्राटनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. ढवळे सोमवारी (दि.५) दुपारी बुध्दविहार परिसरात असतांना संशयिताने त्यास गाठले यावेळी त्याने ढवळे याच्याकडे दारू सेवन करण्यासाठी पैशांची मागणी केली.
ढवळे याने पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने त्यास मारहाण केली. यावेळी ढवळे याने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने त्यास काही तरी वस्तू फेकून मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास पोलिस नाईक माळवाळ करीत आहेत.