नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंजमाळ परिसरात मुलीस शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने संतप्त शेजा-याने मायलेकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत मायलेकी जखमी झाल्या आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमद शेख (रा.भिमवाडी, गंजमाळ) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अक्सा अहमद शेख उर्फ दिपाली संतोष गुडेकर (२३ रा. भिमवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. गुडेकर यांच्या आई शिरीन मुलतानी उर्फ गंगुबाई गुडेकर (३८ रा. वडाळागाव) या बुधवारी (दि.३१) सायंकाळी संशयिताच्या घरी जाब विचारण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली.
तुमची आई माझ्या मुलीस शिवीगाळ का करते असा जाब विचारल्याने संतप्त संशयिताने दोघा मायलेकींना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या मारहाणीत संशयिताने काही तरी हत्याराचा वापर केल्याने दोघी मायलेकी जखमी झाल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.