नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खोडेनगर भागात क्रिकेट खेळण्याच्या वादातून टोळक्याने तरूणास लुटल्याची घटना घडली. बेदम मारहाण करीत भामट्यांनी जखमीच्या खिशातील रोकड व सोनसाखळी बळजबरीने काढून घेतली. याप्रकरणी तालीब एजाज शेख (१८ रा.तेजानी चौक,मोठा राजवाडा वडाळानाका) या युवकाने तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शानू अल्ताफ शहा (२२,वडाळागाव), अली जावेद शहा (२०) व त्यांचे दोन साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. शेख मंगळवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास खोडेनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल पाठीमागील मोकळे मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. या ठिकाणी क्रिकेट खेळण्याच्या कारणातून टोळक्याने त्याच्याशी वाद घालत दमदाटी करीत मारहाण केली.
या घटनेत शेख जखमी होताच संशयितांनी त्याच्या खिशातील रोकड व सोनसाखळी असा सुमारे १ लाख २० हजाराचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक गिते करीत आहेत.