नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागवानपुरा येथे गाडीला कट मारल्याच्या कारणातून दोघा भावांना तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत एक भाऊ जखमी झाला असून पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरिफ असिफ शेख (२६ कादरी मस्जीद समोर,बागवानपुरा),दानिश मुस्ताक शेख (रा.रजा पार्क समोर बागवानपुरा) व अफजल रशिद खान (रा.वडाळा नाका,पुनारोड) अशी दोघा भावांना मारहाण करणाºया संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी हुनेन असिफ शेख (२६ रा.खडकाळी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. हुनेन शेख व त्यांचा भाऊ सोमवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास बागवानपुरा भागात गेले होते.
सपना हॉटेल समोरून ते जात असतांना तिघांनी अडवून शेख यांच्या भावाने गाडीला कट मारला या कारणातून वाद घालत टोळक्याने दोघा भावांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या वेळी त्रिकुटातील एकाने हुनेन शेख या युवकास काही तरी हत्याराने मारहाण केल्याने तो जखमी झाला असून पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.