नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धारदार कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणा-या एकास पोलिसांनी गजाआड केले आहे. संशयिताच्या ताब्यातून कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीतील कांदा फॅक्टरी भागात हा प्रकार घडला.
हेमंत दिनकर सोनवणे (३७ रा.स्वारबाबानगर,सातपूर) असे अटक केलेल्या संशयित कोयताधारीचे नाव आहे. शुक्रवारी (दि.३०) कांदा फॅक्टरी समोर एक तरूण दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाव घेत त्यास ताब्यात घेतले असता संशयिताच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला. याबाबत अंमलदार सागर गुंजाळ यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलिस नाईक खरपडे करीत आहेत.