नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोघा गावगुंडावर कारवाई करत पोलिसांनी त्यांना हद्दपार केले आहे. अंबड आणि उपनगर पोलिस ठाणे हद्दीत हे गावगुंड दहशत निर्माण करत होते. समाधान उर्फ सॅम अशोक बोकड (२३ रा. माऊली मंदिराजवळ, तिरडशेत सातपूर) व पंकज अशोक मोरे (२९ रा.साधू महाराज आश्रमा शेजारी, सोनवणे बाबा चौक समतानगर आगरटाकळी) अशी तडीपार करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या कारवाईची माहिती माहिती परिमंडळ २ च्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.
हद्दपारची कारवाई करण्यात आलेले दोघे अंबड व उपनगर पोलिस ठाणे हद्दीत आपली दहशत कायम राहवी यासाठी सर्वसामान्य नागरीकांना मारहाण, लुटमार, घातक हत्याराने दुखापत करणे, विनयभंग, वाहनांची जाळपोळ असे उपद्रव करत होते. अनेक गुन्हे दाखल होवूनही त्यांच्यात सुधारणा न झाल्याने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त मोनिका राऊत आणि अंबड विभागाचे सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख व नाशिक रोड विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
४९ जण तडीपार
सिडको सातपूरसह नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी तडीपार आणि स्थानबध्दतेचे शस्त्र हाती घेतले आहे. यंदा परिमंडळ २ मधून ४९ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यात एकट्या ऑगस्ट महिन्यात १४ जणांना तडीपार करण्यात आले आहे. मात्र तरीही पोलिसांच्या नाकावर टिच्चून तडिपारांचा वावर शहरातच असल्याचे वारंवार पुढे येत आहे. वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी ९ जणांच्या मुसक्या आवळत थेट गुन्हे दाखल केले आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Police Action Fugitive Criminals