नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या तिघांवर पोलिसांना कारवाई करत रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त केले. गोदापार्क लगत असलेल्या चिंचबनात हे तिन्ही जण जुगार खेळत होते. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन रामदास पेवय (३६ रा. काकडगल्ली, मखमलाबाद), अनिल हिरामण शेवरे (२८ रा.शिंदेचाळ, राहूलवाडी पेठरोड), भटू उर्फ गणेश एकनाथ मोरे (३२ रा. पिंपळनेर जि.धुळे हल्ली फिरस्ता) अशी अटक करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत. चिंचबनात जुगार खेळला जात असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली होती.
गुरूवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी फेरफटका मारला असता गोदापार्कच्या मोकळया जागेत संशयित पत्यांच्या कॅटवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील सुमारे ७३० रूपयांची रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा ऐवज हस्तगत केला असून याप्रकरणी पोलिस शिपाई काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक नांदुर्डीकर करीत आहेत.