नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोडवरील तवलीफाटा भागात भरधाव दुचाकी घसरल्याने ३३ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. सुबोध शत्रुघ्न परदेशी (३३ रा.संजय नगर, पंचवटी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
परदेशी गेल्या २६ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास तवलीफाटा भागात गेले होते. पेठरोडने ते आपल्या घराकडे परतीचा प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. तवलीफाटा येथे भरधाव दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हवालदार व्ही.जे.भोज यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत.