नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सह्याद्री हॉस्पिटल जवळ भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृध्द महिला ठार झाली. जोहरा रोजन पठाण (रा.भारतनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोहरा पठाण या गुरूवारी (दि.४) रात्री भाभानगर परिसरातील सह्याद्री हॉस्पिटल भागातून रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला होता. पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने १०८ अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
येथे उपचार सुरू असतांना डॉ. तुषार दांडगे यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी कैसर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरोधात पोलिस दप्तरी अपघाताची नोद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.