नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळानाका भागात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय पादचारी महिला ठार झाली. म्हाळसा तुकाराम गांगुर्डे (रा.नागसेननगर,वडाळानाका) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांगुर्डे या गुरूवारी (दि.२८) रात्री परिसरातील संजेरी मेडिकल दुकानासमोर रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. रस्त्याने पायी जात असतांना सारडा सर्कल कडून द्वारकाच्या दिशेने भरधाव जाणा-या एमपी ४६ एमके ३२८१ या क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाला.
या घटनेनंत भाचा अतिष गांगुर्डे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असतांना दुस-या दिवशी वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत पोलिस नाईक प्रशांत धाबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten