नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांबळेवाडीतील स्वारबाबानगर भागात कपडे धुण्याचे पाणी अंगणात फेकल्याच्या वादातून शेजा-याने महिलेस थोपटण्याने मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत महिला जखमी झाली असून याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितास तात्काळ अटक केली आहे. वाल्मिक बाळू निकम (रा.कांबळेवाडी,सातपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पीडित महिला व संशयित एकमेकांचे शेजारी असून रविवारी (दि.३०) सकाळच्या सुमारास महिला आपल्या घरासमोरील ओट्यावर कपडे धुवत होती. कपड्यांचे पाणी संशयिताच्या अंगणात फेकल्याने हा वाद झाला. संतप्त संशयिताने शिवीगाळ करीत महिलेस कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाºया लाकडी धोपटण्याने मारहाण केली. या घटनेत महिला जखमी झाली असून अधिक तपास जमादार गावीत करीत आहेत.
श्रमिकनगरला जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई
जुगार खेळणा-या पाच जणांवर पोलिसांनी कारवाई करत संशयितांच्या ताब्यातून साडे तीन हजाराची रोकड व जुगारचे साहित्य हस्तगत केले. औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात उघड्यावर हे जुगार खेळत होते. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. याप्रकरणी युनिटचे हवालदार राजेंद्र घुमरे यांनी तक्रार दाखल केली आहे.
बारकू दौलत माळी (५५ रा.महारूद्रा हनुमान,श्रमिकनगर), जितेंद्र प्रकाश तीरमली (२९ रा. मौनगिरी पतपेढी मागे, श्रमिकनगर), नारायण निवृत्ती तुपसुंदर (३१ रा.हिंदी शाळेजवळ, साईबाबाचौक श्रमिकनगर), राहूल राजेंद्र वाणी (३६ रा.महादेव मंदिराजवळ,श्रमिकनगर) व राजू नामदेव जाधव (५० रा. जाधव मळा,भवर टॉवर समोर, धर्माजी कॉलनी) अशी संशयित जुगारींची नावे आहेत. श्रमिकनगर येथील वंदना माळी यांच्या घरामागील उंबराच्या झाडाच्या आडोशाला काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती युनिट २ च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.३१) सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला असता संशयित पत्यांच्या कॅटवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ३ हजार ४३० रूपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.
nashik city crime police theft dacoity murder suicide fight beaten