नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील लेखानगर भागात विद्यूत वाहिन्यांना पाईपाचा धक्का लागल्याने ३५ वर्षीय कामगाराचा इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना घडली. लक्ष्मण शंकर पवार (३५ रा.संजय गांधीनगर,आनंद रोड देवळाली कॅम्प) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लेखानगर येथील पोस्ट ऑफिस पाठीमागील डिस्पेस ऑफिस परिसरात पाण्याच्या पाईप लाईनचे काम सुरू आहे. लक्ष्मण पवार हा रविवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास लोखंडी पाईप उचलून बाजूला ठेवत असतांना ही घटना घडली. उंच पाईपाचा विद्यूत वाहिन्यांना धक्का लागल्याने पवार यांना इलेक्ट्रीक शॉक लागला होता. या घटनेत ते बेशुध्द झाल्याने भाऊ गोरख पवार यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविणा-या दोघांना अटक
कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविणा-या दोघांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्या ताब्यातून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे. आदित्य परशुराम गदादे (१८) व अजय संतोष पेढेकर (१९ रा. दोघे बजरंगवाडी, नाशिक पुणे मार्ग) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहेत. याबाबत पोलिस शिपाई सागर जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंगवाडी येथील कोथमिरे मटन शॉप भागात दोन तरूण कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री धाव घेत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांच्या अगझडतीत लोखडी कोयता मिळून आला असून अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.