दिवा लावत असतांना कपड्यांनी पेट घेतल्याने गंभीर भाजलेल्या वृध्देचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील विजयनगर भागात तुळशीजवळ दिवा लावत असतांना कपड्यांनी पेट घेतल्याने गंभीर भाजलेल्या वृध्देचा मृत्यू झाला. कमला नारायण निरगुडे (६५ रा.संभाजी चौक,विजयनगर) असे मृत वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निरगुडे या आपल्या घरासमोरील तुळसीला नेहमीप्रमामे दिवा लावत असतांना ही घटना घडली होती. दिवा लावत असतांना अचानक कपड्यांनी पेट घेतल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता मंगळवारी (दि.२२) उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.
२५ वर्षीय युवकाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २५ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सातपूर राजवाडा भागात घडली. विशाल बाळू घोरपडे (रा.दादासाहेब गायकवाड नगर) असे मृत तरूणाचे नाव आहे. घोरपडे यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घोरपडे याने मंगळवारी (दि.२२) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी अॅगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ.राहूल पाटील यांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.