नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकाच घरात तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदिरानगर भागात वडाळा पाथर्डी रोडवरील सराफ नगर येथे ही आत्महत्या केली आहे. या आत्महत्या मागील कारण मात्र अद्याप समोर आलेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आई, वडील आणि मुलगी अशा तीन जणांनी आत्महत्या केली. विजय माणिकराव सहाणे (वय ४०) त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी विजय सहाने (वय ३६) आणि मुलगी अनन्या विजय सहाने असे आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहे. सहाणे हे कंपनीत काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेची माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू केले. या घटनेचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.