नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्या अतिक्रम विभागाच्या गोडावून मधून भंगार चोरीस गेल्या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचोरीमुळे गोडावूनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर खाद्यपदार्थांसह अन्य वस्तू विक्री करणा-याकडून जप्त केलेला ऐवज परस्पर लंपास केल्याचे बोलेल जात आहे. यामागे याविभागातील कर्मचा-यांची मोठी साखळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी माधव काशिनाथ पगार (रा.सरस्वतीनगर,जेलरोड) यांनी तक्रार दिल आहे. दरम्यान या गोडावून मधील जप्तीचा ऐवज परस्पर सोडविला जात असल्याचा आरोप होत असून हा प्रकार पोलिसात पोहचल्याने या चोरीच्या उलगड्याकडे हॉकर्सचे लक्ष लागले आहे.गेल्या मंगळवारी (दि.१) रात्री या गोडावूनच्या आवारातून लोखंडी टेबल,फोर व्हिलर गाडीचे इंजिन,लाकडी हातगाडी, चारचाकीची चेसी व पत्र्याची टपरी असा सुमारे ३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
२४ तास सुरक्षा रक्षक तरी चोरी
मनपाचे आडगाव शिवारातील दहावा मैल परिसरात ट्रक टर्मिनल्स जवळ भंगार ठेवण्यासाठी मोठे गोडावून आहे. मनपाच्या वतीने या गोडावूनला चोवीस तास सुरक्षा यंत्रणा पुरविण्यात आलेली असतांना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर व्यवसाय थाटणा-यांवर मनपाच्या वतीने नियमीत कारवाई केली जाते. दरडोई वसूली होत असतांनाही विक्रेत्यांना या कारवाईस सामोरे जावे लागते. जप्तीचा मुद्देमाल या गोडावून मध्ये ठेवला जातो. हाच मुद्देमालातून चोरी झाली आहे.
nashik city crime municipal corporation godown theft
nmc adgaon encroachment division