नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगfक वसाहतीत एकतर्फी प्रेमातून कामगार महिलेचा पाठलाग करून एका परिचीताने विनयभंग केल्याचा प्रकार घडला. महिलेने जाब विचारला असता संशयिताने दमदाटी केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदार सुरेश वायकर (४७) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिला कारखाना कामगार असून रविवारी (दि.९) ती काम आटोपून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून संशयित तिचा नेहमीच पाठलाग करतो. रविवारी सायंकाळी सुट्टी झाल्याने महिला आपल्या घराकडे जात असतांना संशयिताने तिचा पाठलाग केला. यावेळी त्याने प्रेमाची मागणी करीत मात्र महिलेने त्यास सुनावले असता संशयिताने दमदाटी करीत तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक पाडेकर करीत आहेत.
कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू
जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अज्ञात आजाराने त्रस्त असलेल्या कैद्यावर कारागृह रूग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाळू किसन पवार (५३ मुळ रा.सिरसोली) असे मृत कैद्याचे नाव आहे. बंदी क्र सी १२१०९ हा जन्मठेपीची शिक्षा भोगत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यास अज्ञात आजाराने लागण झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते.
कारागृह रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असतांना शनिवारी (दि.८) रात्री त्यास डॉ.निलकंठ ससाणे यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत जेल कर्मचारी दिपक हिवाळे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक मुन्तोडे करीत आहेत.