नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजिंगमध्ये घेवून जात संशयिताने हे कृत्य केले.
परवेज कादीर शेख (२१ रा. चंदनवाडी, राजूरगाव, ता.अकोला) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित व ती एकमेकांचे परिचीत असून जानेवारी २०२१ मध्ये दोघांची भेट झाली होती. यावेळी संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखविले.
त्यानंतर वेळोवेळी मुलीशी संपर्क साधत तिला शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजिंगमध्ये घेवून जात तिच्यावर बलात्कार केला. संशयिताने लग्नास टाळाटाळ केल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत.