नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुभाषरोड भागात इमारतीच्या जिन्यातून उतरत असतांना एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयितास अटक करण्यात आली आहे. सनी मनोज श्रीवंत (१९ रा.मच्छीमार्केट जवळ, सुभाषरोड) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार परिसरातील मनकवडी मेन्शन सोसायटीत ही घटना घडली. अल्पवयीन पीडिता शनिवारी (दि.३) रात्री इमारतीचा जीना उतरत असतांना संशयिताने तिची वाट अडवित अश्लिल हावभाव करीत विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.