नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – होलाराम कॉलनी जवळ विवाहित महिलेचा तिच्या प्रियकराने खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयितास पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने पाणी न दिल्याने झालेल्या वादातून ही घटना घडली. श्याम अशोक पवार (३२ रा.कस्तूरबानगर,होलाराम कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या घटनेत २९ वर्षीय विवाहित असलेल्या आरतीचा मृत्यू झाला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्याम पवार हा बिगारी काम करत होता तर मृत महिला धुणे भांडी करत होती. मंगळवारी श्याम पवार काम करुन रात्री आठ साडे आठ वाजेच्या सुमारास घरी आला. यावेळेस मुलाकडे त्याने पाणी मागितले. तो खेळत असल्यामुळे त्याने पाणी दिले नाही. त्यामुळे संतापात श्यामने या मुलाच्या मारले. यानंतर श्याम व आरतीमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर आरतीने शिवीगाळ करत श्यामला लाथ मारली. त्यानंतर संतप्त झालेल्या श्यामने जवळच पडलेला धारदार सुरी उचलून आरतीच्या पाठीत खुपसला. त्यात आरतीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडाचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर,निरीक्षक तुषार आढावू तसेच सहाय्यक निरीक्षक खैरणार, भोये आदींनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत संशयितास अटक केली.
असे जुळले प्रेम
आरती व तिचा पहिला पती शहरातील मल्हारखान झोपडपट्टीत राहत होते. गेल्या आठ ते दहा वर्षापासून तिचा नवरा आपल्या कुटुंबियास सोडून गेला. या दांम्पत्यास दोन अपत्य आहे. पती सोडून गेल्यानंतर आरतीचे श्याम पवार याच्याबरोबर प्रेम जुळले. त्यानंतर दोघांनी लग्न न करताच कस्तूरबानगर येथे भाडेतत्वावर रूम घेवून एकत्रीत राहत होते. या दोघांबरोबरच पहिल्या पतीपासून झालेले दोघा मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्याने घेतली.
पहिल्या पतीच्या नातेवाईंकाला भेटण्यावरुन वाद
सात वर्षे त्यांचा हा संसार सुरु होता. पण, पहिल्या पतीच्या नातेवाईला भेटण्यावरु न दोघांमध्ये वाद सुरु झाला. काही दिवसांपूर्वीच आरती ठाणे येथे पहिल्या पतीच्या आजारी बहिणीस भेटण्यासाठी गेली होती. ठाण्यातच भाऊ राहत असल्याने ती कोपरी येथेही गेली. पण, या भोटीगाठीत ती एक दिवस उशीराने घरी परतल्याने दोघांमध्ये वाद झाला होता.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten married women live in relationship