नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी शिवारातील अंजना लॉन्स भागात धारदार कोयत्याचा धाक दाखवित दहशत माजविणा-या कोयताधारीस पोलिसांनी गजाआड केले आहे. श्याम यशवंत जाधव (२३ रा.समर्थ नगर म्हाडा कॉलनी, वडाळा पाथर्डी रोड) असे अटक करण्यात आलेल्या कोयताधारीचे नाव आहे.या कारवाईत पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून कोयता हस्तगत करण्यात केला आहे.
याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजना लॉन्स पाठीमागील स्वराज्य नगरकडे जाणाºया मार्गावर एक तरूण कोयत्याचा धाक दाखवित दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.७) रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी धाव घेत कॉलनी रस्ता भागात संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
त्यांच्या अंगझडतीत कोयता मिळून आला असून याप्रकरणी शिपाई संतोष कोरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.