नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घराच्या सामुहिक भिंत्तीच्या वादातून शेजारी राहणाºया बापलेकाने दोघा भावांवर चाकू हल्ला केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. या घटनेत जखमींच्या आई वडिलांनाही शिवीगाळ करीत बापलेकाने मारहाण केली असून याप्रकरणी सातपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब पुंजाराम गागरे व प्रदिप भाऊसाहेब गागरे (रा.अशोकनगर,सातपूर) असे चाकू हल्ला करणाऱ्या संशयित बापलेकाचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ शंकर गोराणे (२२ रा.ओमशिव अपा.इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ अशोकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार आणि संशयित एकमेकांचे शेजारी असून त्यांच्यात घराच्या सामुहिक भिंतीच्या कारणातून वाद आहे. गोराणे कुटूंबिय शनिवारी (दि.२९) रात्री आपल्या घरासमोर गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली. गागरे बापलेकाने भिंतीच्या जुन्या वादाची कुरापत काढून सौरभ गोराणे आणि भाऊ शुभम गोराणे यांच्यावर चाकू हल्ला केला. या घटनेत सौरभ याच्या पाठीत तर शुभम याच्या हातावर आणि पाठीवर वार करण्यात आल्याने ते जखमी झाले असून त्यांचे आई वडिल आपल्या मुलांच्या बचावासाठी मदतीला धावून आले असता संशयित बापलेकाने त्यांनाही शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
४० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
किशोर सुर्यवंशी मार्ग भागात राहणाºया ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तुषार भिला आहिरे (रा.साई निवास,ओमकार बंगल्याजवळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आहिरे यांनी रविवारी (दि.३०) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही बाब सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी भाऊ राहूल आहिरे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोज करीत आहेत.
Nashik City Crime Knife Attack 2 Booked