नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात दररोज घरफोड्या आणि चोरीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता शिलापूर येथे घरफोडीची घटना घडली आहे. शिलापूर येथे भरदिवसा बंद घराची खिडकी तोडून चोरट्यांनी सुमारे सहा लाखाची रोकड लंपास केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल अशोक कहांडळ (३४) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कहांडळ कुटूंबिय सोमवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराची खिडकी तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील सुमारे ५ लाख ८८ हजाराची रोकड चोरून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.