नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने आडगाव शिवारात गावठी पिस्तूल बाळगणा-या एकास पोलिसांनी गजाआड केले आहे. या संशयिताकडून पिस्तूलसह फायर केलेली बुलेट व दोन खाली असलेल्या पितळी केस जप्त करण्यात आल्या आहेत. योगेश पोपट आहिरे (२५ रा.महादेव मंदिराजवळ,शिवशक्तीचौक सिडको) असे अटक केलेल्या संशयित पिस्तूलधारीचे नाव आहे.
आडगाव शिवारात फिरणा-या एकाकडे पिस्तूल असल्याची माहिती दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे अंमलदार महेश खांडबहाले यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.७) परिसरात सापळा लावून संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संशयिताच्या अंगझडतीत गावठी बनावटीचे पिस्टल, एक फायर केलेली बुलेट व दोन खाली पितळी केस आढळून आली असून पोलिसांनी संशयितासह मुद्देमाल आडगाव पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक किरण रौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजयकुमार सुर्यवंशी,अंमलदार महेश खांडबहाले,तेजस मते,भरत राऊत,युवराज गायकवाड,सागर बोधले,मनिषा कांबळे आदींच्या पथकाने केली.
nashik city crime gun fire bullete arrest