नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईच्या एकाने बेरोजगार तरुणास सरकारी नोकरीचे आमिष दाखवत ६४ हजार रूपयांना गंडा घातला आहे. जावेद खान (रा.मुंबई) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याप्रकरणी चरणप्रीतसिग भजनसिंग सचदेव (रा.आनंदरोड,देवळाली कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली असून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकाची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन महिन्यांच्या कालावधीत हा गंडा घालण्यात आला असून तक्रारदाराने बँक खात्यात व युपीआयच्या माध्यमातून पैसे टाकण्यास भाग पाडण्यात आल्याने ही फसवणुक झाली आहे. संशयित व सचदेव यांच्यात गेल्या मे महिन्यात भेट झाली होती. यावेळी त्याने आपली मुंबई एअरपोर्ट मध्ये चांगली ओळख असल्याचे भासवून सचदेव यांना नोकरीस लावून देण्याची ग्वाही दिली होती.
त्यानंतर तीन महिन्यांच्या काळात सचदेव यांच्याशी फोनवरून संपर्क साधत संशयिताने वेळोवेळी बँक खात्यात आणि युपीआयच्या माध्यमातून पैसे पाठविण्यास भाग पाडले. ६४ हजाराची रक्कम स्विकारूनही नोकरी न लागल्याने सचदेव यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Government Service Cheating