नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली गावातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बळजबरीने अतिप्रसंग केले. त्यानंतर गर्भपात करण्यास सांगितले. पण, लग्नाचे पुरावे नसल्यामुळे गर्भपातास डॅाक्टारांनी नकार दिल्यानंतर धर्मांतर करुन या दोघांनी लग्न केले. त्यानंतर तरुण फरार झाल्याची फिर्याद तरुणीने दिली आहे. या तक्रारीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेबाबत समजेलली माहिती अशी की, पीडित तरुणीची २०१८ मध्ये या तरुणाबरोबर ओळख झाली. त्यानंतर २०१९ पासून प्रेमसंबंध निर्माण झाले व दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यामुळे मार्च २०२३ मध्ये युवती चार महिन्याची गर्भवती राहिली. त्यावेळेस या तरुणाने गर्भपात करण्यास सांगितले. पण, लग्नाचा पुरावा नसल्याने त्यास डॅाक्टरांनी नकार दिला. त्यानंतर दोघांनी लग्न केले. तरुणीचे धर्मांतर करुन तिचे नावही बदलण्यात आले.
यानंतर १८ जुलैला हा तरुण या तरुणीला नगर जिल्ह्यातील लोणी येथे मावशीकडे घेऊन गेला. त्यानंतर २० जुलैला संध्याकाळी लोणी पोलीस ठाण्याचे पोलिस आले. तेव्हा हा तरुण पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी पीडित युवतीला तिच्या आईला बोलावले. तरुणीला आईच्या ताब्यात दिले. त्यानंतर ही फिर्याद नाशिक येथे उपनगर पोलिस ठाण्यात या पीडित तरुणीने दिली. या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.