नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोन मुलींवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यातील एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला आहे. याप्रकरणी सातपूर आणि अंबड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलात्काराची पहिली घटना सिडकोतील शिवपुरी चौकात घडली. उल्हासनगर येथून पाहूणा म्हणून आलेल्या १७ वर्षीय मुलाने आपल्या नातेवाईक असलेल्या १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. गेली वर्षभर कुटुंबिय कामानिमित्त घराबाहेर पडले की संशयित बलात्कार करीत होता. यातून मुलगी गर्भवती राहिली होती. संशयिताने तिला गर्भपाताच्या गोळया खावू घातल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. गर्भपातादरम्यान अतिरक्तश्राव झाल्याने कुटुंबियांनी मुलीस दवाखान्यात दाखल केले असता ही घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
दुस-या घटनेत गुन्हा दिंडोरी पोलिस ठाण्यात दाखल झाला असून तो सातपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दिंडोरी तालूक्यातील पीडित युवतीशी तेजश धनंजय पाटील (रा.शिरसाड ता.यावल,जळगाव) या युवकाशी प्रेमसंबध होते. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवत गेल्या वर्षी सातपूर येथील जिंजर हॉटेल तसेच नाशिकरोड येथील एका लॉजवर घेवून जात वेळोवेळी बलात्कार केला. यावेळी काढलेले अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने हे कृत्य केले. मुलीने लग्नासाठी तगादा लावला असता संशयिताने अश्लिल फोटो आणि व्हिडीओ तिच्या मोबाईलवर पाठवत, तु जर आपल्या संबधाबाबत वाच्यता केल्यास जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने युवतीने पोलिसात धाव घेतली असून दिंडोरी पोलिस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा सातपूर पोलिसांकडे वर्ग झाला आहे. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात बलात्कारासह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक पंकज भालेराव करीत आहेत.