नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहा वर्षाची मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिचे कुणी तरी अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घरासमोर खेळत असतांना ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर दोन दिवसांपासून शोध घेवूनही ती मिळून न आल्याने पालकांनी पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरी विजय बांगर असे बेपत्ता मुलीचे नाव आहे. गौरी मंगळवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास तपोवनरोडवरील सिताराम निवास भागात खेळत असतांना ही घटना घडली. बराच वेळ उलटूनही ती घरी न परतल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे कुटूंबियांनी पोलिसात धाव घेतली असून तिचे कुणी तरी अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
हद्दपारीची कारवाई केलेली असतांनाही शहरात वावर ठेवणा-याला अटक
दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने डोंगरे वसतीगृह भागात हद्दपारीची कारवाई केलेली असतांनाही शहरात वावर ठेवणा-या तडिपारास गजाआड केले. वेदांत संजय चाळगे (१९ रा. वेद मंदिरामागे राहूलनगर, तिडके कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळगे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास पोलिसांनी शहर व जिह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतानाच दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने त्यास हुडकून काढले असून गंगापूर रोड भागातील डोंगरे वसतीगृह मैदान भागात आला असल्याची माहिती मिळताच पथकाने त्यास सापळा लावून जेरबंद केले आहे. याबाबत पथकाचे अंमलदार भरत राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक थेटे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten