नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागातील कॅनोल रोड वरील सह्याद्री कॉलनीत आर्थिक हिशोबाच्या वादातून दीर भावजयीने परस्पर विरोधी तक्रारी केल्या आहेत. बंगल्याच्या घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या वादातून महिलेने विनयभंगाचा तर वृद्धाने भावजयीसह पुतण्याने मारहाण केल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता व वृद्ध दिर एकाच बंगल्यात वेगवेगळे राहतात. पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी (दि.११) पीडितेने ७० वर्षीय वृद्धाकडे घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या हिशोबाच्या पावत्या मागितल्या असता संतप्त वृध्दाने पुतण्यास शिवीगाळ करीत महिलेचा विनयभंग केला. तर वृध्दाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पुतण्या व भावजयीने संगनमत करून शुक्रवारी बंगल्याचे पाणी बिल आणि घरपट्टी भरण्याच्या कारणातून वाद घातला. यावेळी संतप्त दोघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेत अल्युमिनीअमचा रॉड मारल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक गोसावी करीत आहेत.
दोन रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी
सीबीएस चौकात प्रवासी भरण्याच्या वादातून दोन रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत एकास लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिनाथ रणमाळे असे मारहाण करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी भगवान चांगले (रा. तुळजाभवानी नगर, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी चांगले व रणमाळे हे दोघे रिक्षाचालक असून गुरूवारी (दि.१०) ते सीबीएस येथील थांब्यावर आपल्या अॅटो पार्क करून प्रवाश्यांची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली. रिक्षात प्रवासी भरण्याच्या वादातून दोघांमध्ये शाब्दीक चकमक होवून ही हाणामारी झाली. यावेळी संतप्त रणमाळे याने शिवीगाळ करीत रिक्षातील लोखंडी पाईप काढून आणत चांगले यांना मारहाण केली. या घटनेत चांगले यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपाने प्रहार करण्यात आल्याने त्यांचे डोके फुटले असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
nashik city crime fight Controversy autorickshaw driver cbs