नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बोरगड भागात भाचीला वारंवार फोन करतो या कारणातून तिघांमध्ये तुंबळ मारहाण झाल्याची घटना घडली. संशयित झुंज करतांना मिळून आल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन भिमराव कांगणे, रामकिसन भिमराव कांगणे (रा.दोघे श्रीरामनगर बोरगड) व दशरथ बाबुराव भिसे (रा.केतकीनगर,बोरगड) अशी झुंज करतांना मिळून आलेल्या संशयितांची नावे आहेत. शनिवारी (दि.१३) रात्री म्हसरूळ पोलिसांचे पथक बोरगड भागात गस्त घालत असतांना संशयित झुंज करतांना मिळून आले.
भाचीला वारंवार फोन करतो या कारणातून तिघांमध्ये झुंज सुरू होती. याबाबत पोलिस नाईक योगेश देसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक भोये करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658021204136165376?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1657996602202796032?s=20