नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नरफाटा येथील बैठक हॉटेल समोर बिलावरुन मद्याच्या नशेत हाणामारी करणा-या चार जणांवर पोलिसांनी कारवाई केली. संशयित एकमेकांमध्ये झुंज करतांना मिळून आले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश अंबादास चव्हाण (रा.प्रतिक सोसा.कोणार्क नगर), सतिश एकनाथ सांगळे, सुनिल एकनाश सांगळे (रा. दोघे अरिंगळे मळा, एकलहरारोड), रूद्र विष्णू आंधळे (रा.स्टेशनवाडी, विष्णूनगर) अशी कारवाई करण्यात आलेल्या मद्यधुंद संशितांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई नितीन पाचोरे यांनी तक्रार दाखल केली आहे. सिन्नर फाटा परिसरातील बैठक हॉटेल समोरील रस्त्यावर रविवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास संशयित बिलाच्या पैश्यांवरून वाद घालून एकमेकांमध्ये लाठ्या काठ्यांनी मारहाण करतांना मिळून आले. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.