नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरालगत असलेल्या सैय्यद पिंपरी येथील पाटाच्या पाण्यामध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा युवक के के वाघ इंजिनिअरींगचा विद्यार्थी आहे. अभिषेक कैलास खरात असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अभिषक हा कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. तो बेपत्ता असल्याची तक्रार चार दिवसांपूर्वी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्याचा चुलतभाऊ सूरज खरात याने ही तक्रार दिली होती, असे पोलिसांनी सांगितले आहे. अभिषेक हा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. ही आत्महत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.