नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा भागात टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने भामट्याने सुमारे १९ लाख रूपये किमतीची इलेक्ट्रीक कार पळवून नेली. मनोज प्रकाश साळवे असे संशयिताचे नाव आहे. काही तास उलटूनही संशयित कारसह परत न आल्याने वितरकाने पोलिसात धाव घेतली असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी कपील अशोक नारंग (रा.सिरीन मेडोज,गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. नारंग यांचे पाथर्डी फाटा भागात कार मॉल नावाचे शोरूम आहे. इलेक्ट्रीक कार खरेदीचा बहाणा साळवे नामक व्यक्ती शोरूममध्ये आली. विविध कारची व किमतींची माहिती त्याने घेतली. सुमारे १९ लाख रूपये किंमत असलेली इलेक्ट्रीक कार (क्र जीजी २६ एबी ४८४८) त्याने पसंत केली.
यावेळी साळवेने टेस्ट ड्राईव्हची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे नारंग यांनी कार त्याच्या ताब्यात सुपूर्द केल्याने ही घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास घडली. पाच ते सात तास उलटूनही संशयित कार न परतल्याने नारंग यांनी पोलिसात धाव घेतली. अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Electrical Car Theft Test Drive EV Vehicle