नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वे लाईनवर दोघा प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आडगाव आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातत एकाचा धावत्या गाडीतून पडल्याने तर दुस-याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. यातील एका मृताची अद्याप ओळख पटली नाही.
दुसरा अपघात देवलाली कॅम्प ते भगूर दरम्यान झाला. देवळालीचे उपस्टेशन प्रबंधक यांनी याप्रकरणी खबर दिली आहे. सोमवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास डाऊन लाईनवर पोल क्र.१७७ – ०५ ते पोल क्र.१७७ – ०७ या लाईनवर एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गुंजाळ करीत आहेत.
दुस-या अपघातात लाखलगाव रेल्वे पटरी लगत रविवारी अजय मदनदेव सिंग (३०) या प्रवाशाचा मृतदेह आढळून आला. नवनाथ कांडेकर यांनी दिलेल्या खबरी नुसार मृत मनमाड ते नाशिक असा सायंकाळच्या सुमारास प्रवास करीत होता. लाखलगाव उड्डाणपूला जवळ अपलाईन पुल ते पोल न. २००-६ दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, मृत प्रवाश्याचा चेंदामेंदा झाला. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.