शहरा परिसरातून तीन दुचाकी लांबवल्या
नाशिक – शहर परिसरातून दुचाकी चोरी होण्याच्या घटना सुरूच आहेत. आताही तीन दुचाकी चोरीच्या घटनांच्या तक्रारी आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कसोशीने तपास करण्याची मागणी होत आहे.
ठक्कर बाजार बसस्थानकातील पद्मा लक्ष्मी हॉटेल समोरुन चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी मितेंद्र दीपक बागूल (वय २८, शिवशक्ती चौक सिडको) यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. तक्रारदार बागूल यांनी १३ सप्टेंबरला रात्री आठला पद्मा लक्ष्मी हॉटेल समोर त्यांची दुचाकी हिरो पॅशन (एमएच १५ जीबी २१०९) हि अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. दुसऱ्या घटनेत रियोज्जोद्दिन शेख (वय ४२,नानावली जुने नाशिक)
यांनी त्यांची दुचाकी ३० सप्टेंबरला दुपारी बाराला चोरीला गेली.
शिवाजी रोड वरील दीपसागर कॉर्नर परिसरात हिरो एचएफ डिलक्स ही लाल रंगाची दुचाकी (एमएच १५ ईसी४१८७) लावली असता चोरट्यांनी चोरुन नेली.याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिसरा प्रकार बळी मंदीर परिसरात उघडकीस आला. तर, किरण किसन उगले (गोपाळनगर) यांची त्यांची हिरो होंडा शाईन (एमएच १५ जीडीब्लू १२९४) ही दुचाकी बळी मंदीर परिसरात लावली असता शुक्रवारी (ता.१) सायंकाळी सातला चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली.
पंचवटीत कृष्णनगरला घरफोडी
नाशिक – पंचवटीतील कृष्णनगर परिसरात काल घरफोडीत बारा हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. आशीष आदर्श मुलचंदानी (वय २९, गोविंद संकूल कृष्णनगर पंचवटी) यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी २५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान कधी तरी चोरट्यांनी मुलचंदानी यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे लॅच कशाने तरी तोडून दरवाजा उघडून घरातील बेडरुमधील कपाटातील रोकड चोरुन नेली. त्यात, १२ हजाराच्या रोख रकमेसह जुने कपडे, वापरत्या साड्या असा ऐवज चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस.सी. कासर्ले तपास करीत आहे.
आडगावला रसवंतीतून ऐवज लांबविला
नाशिक – आडगाव शिवारात जत्रा हॉटेल जवळील स्टेंट बॅकेसमोरील रसवंती दुकानातून चोरट्यांनी पन्नास हजाराचा ऐवज लांबविला. शनिवारी (ता.२) सायंकाळी पाचला हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी आशा रामेश्वर मोरया (वय ३०, सिधी मध्यप्रदेश सध्या मोना सुपर मार्केट आडगाव) यांच्या तक्रारीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, आशा मोरया यांचे जत्रा हॉटेल समोर साईनाथ रसवंती नावाचे फळविक्रीचे दुकान आहे. त्यांच्या उघड्या दुकानातून पाळत चोरट्यांनी १४ ग्रॅमची सोन्याची पोत, २ ग्रॅमचे सोन्याचा टॉप्स , सॅमसग कंपनीचा मोबाईल असा सुमारे हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.